भक्तिरसाचा महिमा, दीड तास अनुभवा! सोनी मराठीवर२५ ऑक्टोबरपासून, संध्या. ६.३० वाजल्यापासून

भक्तिरसाचा महिमा, दीड तास अनुभवा ! सोनी मराठीवर२५ ऑक्टोबरपासून, संध्या. ६.३० वाजल्यापासून

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ आणि ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिका सध्या रोज एक तास प्रेक्षकांना भक्तिरसाचा आनंद देताहेत. पण २५ ऑक्टोबरपासून या आनंदात भर पडणार आहे. प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून दीड तास या भक्तीरसाचा आस्वाद घेता येणार आहे. या दीड तासात ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत मच्छिन्द्रनाथांचे स्त्रीराज्यात आगमन होणार असून राज्यातल्या स्त्रियांना नाथांबद्दल कुतूहल आहे.

लवकरच मैनावतीचा नाथांशी विवाह होणार असल्याचीही शक्यता आहे. मैनावतीने पाठवलेल्या गोष्टी नाथ स्वीकारणार का, मैनावतीने जाहीर केलेल्या उत्सवाला नवीन वेश परिधान करून जाणार का; याची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेत मोठ्या गोरक्षनाथांचा प्रवेशही होणार आहे. गुरू संकटात आहेत आणि त्यांना शोधून त्या संकटातून सोडवलं पाहिजे या हेतूने गोरक्षनाथांचा प्रवास सुरू होताना दिसणार आहे.

तर ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांचा आई-वडिलांच्या देहान्त प्रायश्चित्तानंतरचा खडतर प्रवास सुरू होणार आहे. मुक्ताई आजारी पडल्यावर तिच्यासाठी सप्तपर्णीचे वेल आणण्यासाठी माउली स्वतः निबिड अरण्यात जाणार. तिथे त्यांचा सापाशी सामना होणारा. माउलींना स्फुरलेला दिवाळी अभंग, त्यांनी साजरी केलेली दिवाळी, शुद्धिपत्रासाठी सुरू झालेली पैठण यात्रा आणि माउलींकडून झालेली हरिपाठाची निर्मिती; असे अनेक अनोखे प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

हे ही पहा:

Previous Post
‘राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही’

‘राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही’

Next Post
१७ डिसेंबरला बसणार जब्याचा 'फ्री हिट दणका'

१७ डिसेंबरला बसणार जब्याचा ‘फ्री हिट दणका’

Related Posts
rajesh tope - corona

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळताच राजेश टोपेंनी केले ‘हे’ आवाहन

मुंबई : वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत…
Read More
Zareena Wahab | चित्रपटात राधा मातेची भूमिका निभावण्यासाठी अभिनेत्रीला सोडावा लागला होता मांसाहार

Zareena Wahab | चित्रपटात राधा मातेची भूमिका निभावण्यासाठी अभिनेत्रीला सोडावा लागला होता मांसाहार

Zareena Wahab | 70 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आजही…
Read More
मंत्रीपद न मिळालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'कदाचित पक्षाने...'

मंत्रीपद न मिळालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘कदाचित पक्षाने…’

Sudhir Mungantiwar | महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये अनेक जुन्या नेत्यांना स्थान मिळालेले नाही. दरम्यान,…
Read More