दारूच्या नशेत दोन तरुणांनी केलं लग्न; मात्र, पुढे जे घडलं ते भयंकर आहे. 

चांदूर –  तेलंगणामध्ये दारूच्या नशेत (under the influence of alcohol) दोन तरुणांनी लग्न (two young men got married) केल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 एप्रिल रोजी मेडक जिल्ह्यातील चांदूर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय ऑटोचालकाने जोगीपेट येथील संगारेड्डी जिल्ह्यातील एका व्यक्तीशी लग्न केले. यातील एका व्यक्तीचे वय 21 वर्षे आणि दुसऱ्याचे वय 22 वर्षे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन पुरुष डुमापलापेट गावात एका ताडीच्या दुकानात भेटले आणि त्यांची मैत्री झाली. यानंतर ते दारू पिण्यासाठी अनेकदा भेटू लागले. यानंतर दारूच्या नशेत असताना जोगीनाथ गुट्टा मंदिरात हा विवाह केला होता.

काही दिवसांनी यातील एका तरुणाने दुसऱ्याच्या घरी जाऊन आपल्या लग्नाची माहिती पालकांना दिली. त्याने पालकांना सांगितले की त्याला त्यांच्या मुलाकडे राहण्याची परवानगी द्यावी, कारण त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नाही. लाखो विनंत्या करूनही पालकांनी त्या व्यक्तीला घरात येऊ दिले नाही.

या वादानंतर विभक्त राहण्यासाठी त्या पालकांकडून एक लाख रुपयांची मागणीही  केली. पुढे आपापसात चर्चा करून हा प्रश्न सोडवला गेला आहे. वाटाघाटीनंतर जोगीपेठ येथील व्यक्तीने दुसऱ्या  कुटुंबाकडून 10,000 रुपयांच्या एकरकमी तडजोडीसाठी सहमती दर्शवली. यानंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने ते वेगळे झाले.