कधी ओठांवर, कधी कानावर; तुमच्या पार्टनरच्या Kiss करण्याच्या पद्धतीवरून ओळखा त्याचा मूड, वाचा किसचे अर्थ

Meaning Of Kisses : प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी हातात हात घेऊन प्रेम व्यक्त करतं, कोणी मिठी मारून तर कोणी किस करून प्रेम दाखवतात. जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी किस केला जातो. किस केवळ दोन पार्टनर्समध्ये होत नाही, आई तिच्या मुलाला कितीही वेळा किस देते. घरातील वडीलधारी मंडळीही जसे की आजी, आजोबा नातवांना गालावर किस देतात. प्रेम व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग क्वचितच असू शकतो.

परंतु किस कसे घ्यायचे हे प्रत्येकाला माहित आहे परंतु ‘किसिंग’ चा अर्थ माहित नसतो. आज आम्ही शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर किस घेण्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर कदाचित तुम्हाला समजेल की तुम्ही किंवा इतर कोणी शरीराच्या अमुक जागी का किस केले असावे?

किस का करतात?
रागाच्या भरात किंवा द्वेषाने कोणीही कोणाचे किस घेऊ शकत नाही. कारण किस ही केवळ आनंद व्यक्त करण्याची प्रक्रिया आहे. आता शरीराच्या इतर भागांवर किस घेण्याची कारणे समजून घेऊया…

ओठांवरील किस (Lip Kiss)

फक्त तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्या ओठांवर किस घेतो. शरीराच्या या भागाचे किस त्या व्यक्तीने केलेले असते, ज्याच्यावर तुम्ही असीम प्रेम करता. किंवा असे म्हणू शकतो की, ज्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त प्रेम आहे, त्याच्या ओठांवर तुम्ही किस नि:संकोच होऊन किस करता. ओठांवर किस घेणे खूप संवेदनशील असते. जर तुमचा पार्टनर अचानक ओठांवर किस करू लागला तर समजून घ्या की, तो एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी आहे. तो त्याच्या आनंदाला शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही, म्हणून तो किसद्वारे त्याचा आनंद किंवा प्रेम व्यक्त करतो.

कपाळावरील किस (Forehead Kiss)

कपाळावर किस घेणे म्हणजे आत्मविश्वास वाढवणे आणि अस्वस्थता दूर करणे. म्हणूनच पालकांपासून शिक्षकांपर्यंत मुलांच्या कपाळाचे किस घेतले जाते. तुमचा पार्टनर कधी नाराज असेल तर त्याच्या कपाळावर किस घ्यायला विसरू नका. या व्यतिरिक्त जर तुमचे मूल देखील एखाद्या गोष्टीबद्दल घाबरत असेल तर त्याचा चेहरा धरून त्याच्या कपाळाचे चुंबन घ्या. असे केल्याने त्याचे मनोबल वाढेल.

गालावरील किस (Cheek Kiss)

गालावर किस करणे म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यावरील लाड, प्रेम व्यक्त करत आहे. तुमचा निरागसपणा आणि बालिश सवयी पाहून कधी कधी तुमचा पार्टनरही तुम्हाला गालावर किस करेल. किंवा त्याला तुमच्यावर खूप लाड आला असेल तर तो तुमच्या गालाची किस घेऊ शकतो.

कानावरील किस (Earlobe Kiss)

फक्त नवरा-बायको आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडलाच कानावर चुंबन घ्यायला आवडते. हे पार्टनरचा खोडकर मूड दर्शवते. म्हणूनच जर कधी तुमच्या जोडीदाराने कानावर चुंबन घेतले तर स्वतःलाही खोडकर होऊद्या.

हातावरील किस (Kiss On Hand)

हातांचे चुंबन घेणे म्हणजे एखाद्याच्या प्रेमात स्वतःला समर्पण करणे. म्हणूनच लोक पार्टनरला अंगठी घातल्यानंतर हातांचे चुंबन घेतात. या व्यतिरिक्त, जर तुमचा कोणी मित्र किंवा साथीदार हातावर चुंबन घेतो, तर ते तुमच्या एखाद्या गोष्टीचे कौतुक करत असतात.