…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन – उदयनराजे भोसले

सातारा – खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की, “जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन.”

उदयनराजे म्हणाले की, “माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करू. उदयनराजे म्हणाले की, “हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसं कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही.”