बाळासाहेब भोळे होते, मी भोळा नाही धूर्त आहे – उद्धव ठाकरे 

मुंबई – राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी इंधन दरवाढीवरून केलेल्या टीकेपासून ते महाराष्ट्रातील नवहिंदुत्ववादी राजकारण तसं राणा दांपत्यासहित अनेकांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपाच्या ‘ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही’ या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलंय.

ते म्हणाले, हो बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेबांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच त्यामुळेच मी भाजपासोबत(BJP)  धुर्तपणे वागत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसं करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.