Uddhav Thackeray | मला नकली संतान म्हणताना मला प्रमाणपत्र देणारे तुम्ही काय ब्रह्मदेवाचे बाप आहात का?

Uddhav Thackeray | आमचे घराणे काढणारे मोदी यांचे घराणे मला माहीत नाही, परंतु माझ्या सात पिढ्यांनी देशासाठी योगदान दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुमचा पक्ष किंवा तुमचे पूर्वज कुठेही नव्हते. मला नकली संतान म्हणताना मला प्रमाणपत्र देणारे तुम्ही काय ब्रह्मदेवाचे बाप आहात का? असा सवाल उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त प्रचार ‘परिवर्तन सभा’ मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडली. येथे तो बोलत होते.

या सभेला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आपचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेनेची घराणेशाही चालत नाही, मात्र गद्दारांची घराणेशाही चालले. शिवसेना-भाजप युतीचा पाय रचणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारून काय साधले? असा सवाल करत, प्रमोद महाजन हयात असते, तर तुम्ही राजकारणात दिसला नसता, असा दावा ठाकरे यांनी केला. ‘‘महाराष्ट्राला भिकारी करायला निघालेल्या या पंतप्रधानांना या पदावर बसण्यासाठी मदत केली याचा पश्चात्ताप होत आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायची यांची योग्यता नाही,’’ असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप