आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली

आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली

Narayan Rane | महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ खासदार नारायण राणे यांनी शनिवारी केला.

आता दिशाच्या वडिलांवर दबाव नसल्याने त्यांनी न्यायासाठी कोर्टाकडे धाव घेतली असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही असा सवालही खा. राणे यांनी यावेळी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी खा. राणे (Narayan Rane) म्हणाले की तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव टाकला होता. या दबावामुळेच त्यांना त्यावेळी तशी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा कर्ता करविता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे होता, असा आरोपही राणे यांनी केला. सरकारने आता नव्याने एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी ही त्यांनी केली.

दिशाच्या वडिलांनीच कर्तव्यात कसूर करणा-या पोलिस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे सांगत खा.राणे म्हणाले की पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना त्यावेळी केलेल्या दिरंगाई बद्दल जाब विचारावा आणि दोषी अधिका-यांना निलंबित करावे. दिशा सालियानला न्याय मिळायलाच हवा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी, असेही खा. राणे यांनी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी

उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार

पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा

Previous Post
दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नारायण राणे यांचा हल्लाबोल

दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नारायण राणे यांचा हल्लाबोल

Next Post
'वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024'मध्ये भारताच्या पुढे पाकिस्तान

‘वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024’मध्ये भारताच्या पुढे पाकिस्तान

Related Posts
jitendra awhad - ram satpute

‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळं करायचा संकल्प केलेला दिसतोय’

 मुंबई : म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही…
Read More
माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

My Home India : राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीच्या निमित्ताने…
Read More
शिलालेख

लातूर जिल्ह्यातील शिलालेख आणि ताम्रपट

प्राचीन काळातील संस्कृती, वारसा शोधण्यासाठी भारतीय पुरातत्वीय, अभ्यासासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे दगडावर कोरलेली तत्कालीन लिखित भाषा म्हणजेच…
Read More