Uddhav Thackeray | महाराष्ट्र हा शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे, तो मोदीशाह यांचा होऊ देणार नाही. भाजपाने ४०० पारचा नारा दिला, आपण अब की बार भाजपा तडीपार चा नारा दिला आणि मग भाजपा गप्प झाले, त्यानंतर त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा काढला. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडले त्याच रस्त्यावरून नरेंद्र मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. शिवसेनेने भाजपाला कठीण काळात मदत केली त्या शिवसेनेला नकली म्हणता. १० वर्षात मोदींनी काय केले, प्रचारात ते सारखे हिंदू मुस्लीम, हिंदू मुस्लीम करत आहेत. कधी घुसखोर म्हणता, देशद्रोही ठरवता. देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. ज्या प्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर करुन त्या रात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे संपवल्या तसेच नरेंद्र मोदी हे शेवटचे मुंबईत आले आहेत, ४ तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठणकावून सांगितले.
बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :