हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रात नवा राजकीय समीकरण पाहायला मिळालं आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray), एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. हिंदी सक्तीविरोधातील लढ्यात विजय मिळाल्यानंतर आज दोघांनी एकत्र येत ‘विजयी मेळावा’ आयोजित केला.
या ऐतिहासिक मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत स्पष्ट केलं की, “आम्ही आज एकत्र आलो आहोत, ते कायम एकत्र राहण्यासाठीच!” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
याच वेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “आम्ही एकत्र आलो म्हणून काही जणांचे पोट दुखू लागले आहे. कदाचित कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असतील, रेडे कापत असतील!” असा टोला त्यांनी शिंदे गटावर लगावला.