उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं की राज्य कसं चालवायचं – नवनीत राणा

मुंबई –  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी काल सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

आज पुन्हा एकदा राणा दाम्पत्याने शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सूडाच्या कारवाईची माहिती लोकसभा अध्यक्षांसह गृहमंत्र्यांना देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.

नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं की राज्य कसं चालवायचं. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष यशस्वीपणे राज्य चालवून दाखवलं. त्यांनी विरोधकांवर अशी कारवाई केली नाही. सत्तेचा गैरवापर केला नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी मला नैतिकता शिकवू नये. बाळासाहेबांची नैतिकता हे विसरले. आम्ही लढणारे लोक आहोत, घाबरणारे नाही.