Uddhav Thackeray | दुटप्पी भूमिका ठाकरेंना भोवणार ? मराठा आंदोलक ठाकरेंच्या निवासस्थानी धडकणार

Uddhav Thackeray | दुटप्पी भूमिका ठाकरेंना भोवणार ? मराठा आंदोलक ठाकरेंच्या निवासस्थानी धडकणार

Uddhav Thackeray | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन खासदार शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठाकरे हे कोणतीही ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच मराठा संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यातच आता आंदोलन करण्यासाठी  मराठा आंदोलकांच्या (Maratha Protest) गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला आहे.

उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार मराठा आंदोलकांच्या या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने काल (29 जुलै) मातोश्रीवर धडक दिली होती. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटता उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले होते. ठाकरेंची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’

Sharad Pawar | महाराष्ट्रात मणीपुरसारखी स्थिती स्थिती निर्माण व्हायला नको, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Ajit Pawar | मास्क, टोपी घालून दिल्लीला जायचो; अजित पवारांनी सांगितली महायुतीत जातानाची इनसाइड स्टोरी

Total
0
Shares
Previous Post
Prakash Ambedkar | आरक्षण बचाव यात्रेचे पंकजा मुंडे यांच्याकडून स्वागत

Prakash Ambedkar | आरक्षण बचाव यात्रेचे पंकजा मुंडे यांच्याकडून स्वागत

Next Post
Delhi News | तीन विद्यार्थ्यांचा कोचिंग वर्गात बुडून मृत्यू ; चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती केली स्थापन

Delhi News | तीन विद्यार्थ्यांचा कोचिंग वर्गात बुडून मृत्यू ; चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती केली स्थापन

Related Posts
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे… शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

भावी मुख्यमंत्री राज ठाकरे… शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

मुंबई :  गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa)  शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे..…
Read More
Busniess Investment

या कंपनीच्या शेअर्सने 1 लाखाचे 13 लाख बनवून दिले, फक्त 6 महिन्यांत दिला 866 टक्के परतावा

मुंबई – अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात श्रीमंत केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पेनी स्टॉकबद्दल…
Read More
'एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते'

‘एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते’

मुंबई – : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काल…
Read More