उध्दव ठाकरेंना देशाचे नेतृत्व करायचे आहे – संजय राऊत 

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, मुख्यमंत्री बोलण्यापूर्वी  खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. यात ते म्हणाले, हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले. धर्माभिमानी संभाजी महारांजाचे हिंदुत्व तेच शिवसेनेचे हिंदुत्व. काल ओवेसी आला औरंगजेबाच्या कबरीपुढे नमाज पडला. त्याचा निषेध. भाजपची टीका मात्र शिवसेनेवर केली जातेय.

औरंगजेबाचा जन्म गुजरात आणि छत्रपती महाराज जन्माला आले महाराष्ट्रात. तीच लढाई आपण सध्या त्याच मुळाशी लढतोय. आज कश्मीरातला हिंदू सर्वात जास्त धोक्यात. परवा दुपारी राहुल भटला त्याच्या कार्यालयात त्याला अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. काल पंडित निषेध करायला रस्त्यावर आले तर केंद्र सरकारने लाठी चार्ज केला. उध्दव ठाकरेंना देशाचे नेतृत्व करायचे आहे. हिमालय सह्याद्री एकत्र राहतील.असं राऊत म्हणाले.