Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule | एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पुढे बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Gautam Gambhir | कर्णधार म्हणून सूर्यकुमारमधील क्षमता ओळखायला चुकलो, गौतम गंभीरचा वाटतेय या गोष्टीची खंत

Gautam Gambhir | कर्णधार म्हणून सूर्यकुमारमधील क्षमता ओळखायला चुकलो, गौतम गंभीरचा वाटतेय या गोष्टीची खंत

Next Post
Chandrashekhar Bawankule | राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल उद्धव ठाकरे गप्प का?

Chandrashekhar Bawankule | राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल उद्धव ठाकरे गप्प का?

Related Posts
bailgada

बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!

पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च…
Read More
प्रकाश आंबेडकरांचे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र!

प्रकाश आंबेडकरांचे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र!

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (6 डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक…
Read More
पीरियड्समध्ये 'या' रंगाचे रक्त जात असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा! मासिक पाळीतील रक्त आरोग्याविषयी देते माहिती

पीरियड्समध्ये ‘या’ रंगाचे रक्त जात असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा! मासिक पाळीतील रक्त आरोग्याविषयी देते माहिती

मासिक पाळीचे (Periods) काही दिवस असे असतात की, प्रत्येक स्त्रीला तिला पाहिजे असो किंवा नसो त्यातून जावे लागते.…
Read More