Chandrashekhar Bawankule | मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय. पण आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे.
उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 1, 2024
उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांमधून झोडपल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी स्वतःची मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली. त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्यांच्या विखारी भाषेला जशास तसं प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप