‘उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question)आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. यासोबतच काही फोटोज आणि व्हिडीओ देखील शेअर केले जात असून मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना नागरिक सभा स्थानावरून निघून चालल्याचे दिसत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे तसेच मनसेच्या अनेक नेत्यांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत.

संभाजीनगर येथील सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते. भाषण संपेपर्यंत 40% मैदान रिकामं झालं होतं आणि म्हणे हे लाडके मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा तुम्ही बोललात मी संभाजीनगर नाव कधीही करू शकतो पण लगेच विषय बदलला. असं राणे यांनी म्हटले आहे.