‘उद्धवजी… छत्रपतींचा सन्मान करता येत नसेल तर किमान अपमान तरी करायचा नव्हता…’

मुंबई – संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यातच आज त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे छत्रपती (sambhajiRaje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत (Sambhaji Raje Press Conference) ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मागील १५ ते २० वर्षांपासून मी घर सोडून काम करतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कुणी मला राज्यसभेत पाठवलं, हे न पाहता समाजाची भूमिका प्रांजळपणाने मांडली. हे सगळं लक्षात घेऊन मी सर्वांना राज्यसभेत पाठवण्याचं आवाहन केलं होतं,” असं संभाजीराजे म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मी मुंबईत आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलण्याची इच्छा नाही. माझ्या तत्वात, स्वभावात, हे नाही. पण मला ते बोलायचं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो वा पुतळा. आपण दोघांनी तिथं जाऊ. शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल, तर तुम्ही आधी सांगा, असं आव्हान संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच  मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून विरोधक आता शिवसेनेला लक्ष्य  करत आहेत.मनसेचे नेते योगेश खैरे यांनी याच मुद्द्यावरून सेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज फक्त भाषणात राजकारणासाठी वापरायचे… पण त्यांच्या वंशजांच्या रूपाने ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिसले असते तर त्यासाठी थोडा त्याग करता आला नाही ! सन्मान करता येत नसेल तर किमान अपमान तरी करायचा नव्हता… छत्रपतींनी इतकं उद्विग्न होणं क्लेशदायक आहे ! असं खैरे म्हणाले.