उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल :  फडणवीस

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक (Arrest) केल्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, तत्पूर्वी भाजप नेत्यांची जोरदार भाषणे आझाद मैदानावर झाली. यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. अनिल देशमुखांचा राजीनामा घेता, संजय राठोडांचा राजीनामा घेता तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजलं पाहिजे. नवाबचा राजीनामा का घेत नाही हे समजलं पाहिजे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्श केल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले.

आम्ही नवाब मलिकांचा   राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू नाही बाळसााहेब (balasaheb thackeray) आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू, असा घणाघातील हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला.