वॉशिंग्टन/कीव | युक्रेन-रशिया युद्धाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हेच जबाबदार असल्याची टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. झेलेन्स्की हे अक्षम आणि वाटाघाटी करण्यात कमकुवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी नवी शांतता वाटाघाटी सुरू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांमध्ये युक्रेनला वगळण्यात आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी ही टीका केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचा आदर असल्याचे सांगितले. मात्र, ट्रम्प हे रशियाने पसरवलेल्या चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनबाबत पुन्हा वाटाघाटी करायला तयार असल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. त्यामुळे पुढील राजकीय हालचालींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse