युगांडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑलिम्पिक (Uganda athlete) ऍथलीट रेबेटा चेपतेगी हिचा पेट्रोल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या प्रियकराने पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.
33 वर्षीय मॅरेथॉन धावपटू नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. रविवारी (01 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्यात ती गंभीररीत्या भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
वायव्य केनियातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेबेका चर्चमधून परतत असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला. रेबेका उत्तर-पश्चिम केनियामध्ये राहत होती आणि तिने येथे प्रशिक्षणही घेतले होते. स्थानिक प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यात खेळाडू आणि त्याच्या जोडीदारामध्ये जमिनीचा वाद सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
युगांडाच्या ऍथलीट्स (Uganda athlete)फेडरेशनने ट्विटरवर लिहिले, “आमच्या एका ऍथलीट, रेबेका चेप्टेगीचे आज सकाळी निधन झाल्याची घोषणा आम्ही अत्यंत दुःखाने करत आहोत. ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करतो आणि न्यायाची मागणी करतो.”
रेबेकाच्या कुटुंबाने तिच्या मृत्यूबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी तिला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे तिच्यावर उपचार करणारे डॉ. ओवेन मेनश यांनी सांगितले की, अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप