राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरण मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांच्या मृत्यूमुळे आणखीनच तापले. राड्यानंतर जय मालोकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबियांकडून मनसे कार्यकर्त्यांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर मनसे पदाधिकाऱ्यांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
जय मालोकार हे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. याबाबत राष्ट्रवादीच्या अकोला जिल्हाध्यक्षांसोबत जय मालोकर यांचे बोलणे झाले होते. मात्र, जय मालोकार राष्ट्रवादीत जातोय याचा राग अकोल्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :