नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज

Aurangzeb :  नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.मात्र यावेळी या उपोषणस्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत इम्तियाज जलील उपोषणाला बसले आहे. पण उपोषणस्थळी जलील समर्थकांनी औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी करत फोटो झळकावला आहे. ‘जब तक सुरज चाँद रहेंगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा’ अशा घोषणाच या समर्थकांनी दिल्या. औरंगजेबाच्या घोषणाबाजी केल्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.