अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब; पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला नवा आरोप

मुंबई –  पोलिस अधिकारी अनुप डांगे(police officer anup dange) यांनी आणखी एक लेटर बॉम्ब(letter bomb) टाकला आहे. त्यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे(dgp sanjay pande) यांना पत्र(letter) लिहिलं आहे. पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव आणि नवलानी विरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम योग्य तपास न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (letter bomb from Anup Dange)

अनुप डांगेंनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव लिहिली आहेत. तसंच नवलानीविरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम नीट तपास न केल्याचा आरोप ही केला आहे.याप्रकरणी तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे(police inspector kishor shinde), त्यावेळचे एसीपी किरण काळे(acp kiran kale) आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डांगे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.  उच्च न्यायालयाने(highcourt) नवलानी विरोधात दाखल असलेला गावदेवी पोलिस ठाण्यातील(Gavdevi police station) गुन्हा रद्द केला आहे. या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देऊन पुन्हा नीट तपास केला जावा अशी मागणी अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.