राज ठाकरे यांच्या नकला पहायला लोकं येतात, पण मत कुणीच देत नाही – खैरे

औरंगाबाद – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance) घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दरम्यान, आता शिवसेनेने या सभेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ऐकायला लोक येतात, त्यांच्या नकला पहायला येतात, पण मत कुणीच देत नाही, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज ठाकरे यांच्या सभेने शिवसेनेला (Shivsena) काहीच फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे यांना जनाधार नाही, लोक त्यांना ऐकायला गर्दी करतात, त्यांनी केलेल्या इतरांच्या नकला पाहून टाळ्या, शिट्या वाजवतात, पण प्रत्यक्ष मतदान करायची वेळ आली की पाठ फिरवतात. माझ्या विरोधात तेव्हा मनसेत असलेले सुभाष पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड जाहीर सभा झाली, पण प्रत्यक्षात पाटील यांनी जिल्ह्यातून फक्त १७ हजार मते मिळाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. असा दावा खैरे यांनी केलाय.