नेहरू-गांधींच्या नावावर आम्ही तीन पिढ्या बसून खातील एवढं कमावलं; काँग्रेस आमदाराचा दावा 

बेंगलुरू:  काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी पुन्हा वाद निर्माण केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी नेहरू आणि गांधी यांच्या नावावर खुप कमावलं आहे. आमच्या तीन-चार पिढ्यांसाठी ते खूप आहे, असं वक्तव्य केलं आहे. (Congress Latest Marathi News) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ईडी चौकशीविरोधात बेंगलुरू येथे गुरूवारी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना रमेश कुमार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर एवढी संपत्ती कमावली आहे की जी तीन ते चार पिढ्यांना पुरेल. आज आम्ही बलिदान दिलं नाही तर भविष्यात आम्ही कमवलेलं सडून जाईल.

काँग्रेस आमदार केआर रमेश कुमार म्हणाले, आम्ही नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावाने आमच्या 3 ते 4 पिढ्यांसाठी पुरेसा पैसा कमावला आहे. आपण काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यासाठी इतका त्यागही करू शकत नसलो तर ते आपल्यासाठी चांगले होणार नाही.