सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा ‘हा’ लूक पाहून इंस्टाप्रेमी घायाळ

मुंबई – मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिडा जगतामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात मध्ये कोरले आहे . त्याच्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाला एका उच्च पदावर नेऊन ठेवले आहे . पण तुम्हाला माहिती आहे का ? कि सचिन तेंडुलकरला एक सुंदर मुलगी आहे जिचे नाव सारा आहे . आज आम्ही तुम्हाला सचिन विषयी न सांगता सारा विषयी सांगणार आहोत .

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंगच्या क्षेत्रांमध्ये आपले नशीब आजमावण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिने एका लोकप्रिय कपड्याच्या प्रचार करण्यासाठी एक व्हिडीओ शूट केला आहे . हाच व्हिडिओ पोस्ट करून तिने तिच्या फॅन्सची वाहवाही मिळवली आहे .

तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. सारा सोशल मिडिया साईट्सवर नेहमीच अॅक्टीव्ह असते . या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत आणखी दोन मॉडेल्स दिसत आहेत . या तिघीजणी या लोकप्रिय कपड्यांच्या ब्रँडसाठी पोज देताना दिसत आहेत . एकंदरीत साराचे या क्षेत्रांमध्ये नवखे पदार्पण असले तरीही तिची एन्ट्री तिच्या या क्षेत्रातील भविष्याविषयी विषयी बरंच काही सांगून जाते

You May Also Like