एटीएममधून पैसे काढणे होणार महाग , जाणून घ्या किती लागणार पैसे

येत्या 1 जानेवारीपासून बँक ग्राहकांनाा सेवापोटी अधिक शुल्काचा फटका बसणार आहे . अनेक बँकांनी आर्थिक आणि गैरआर्थिक सेवा नियमांत बदल केले आहेत. हे बदल येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लागू होतील. पोस्ट खात्यातंर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकनेही एटीएम व्यवहार, बँक व्यवहार नियमांमध्ये बदल केला आहे. या नवीन नियमानुसार पहिले चार व्यवहार त्यासाठी अधिकचे पैसे लागणार नाहीत. मात्र त्यापुढील व्यवहारासाठी मात्र 0.50 टक्के म्हणजे प्रतिव्यहार 25 रुपयांपर्यत ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत.

म्हणजेच काय चार व्यवहार केल्यानंतर त्या पुढील व्यवहारासाठी पैसे लागणार आहेत. खात्यात पैसे जमा करण्यासाठी मात्र कोणतेच चार्ज लागणार नाहीत. पोस्टाप्रमाणे इतर बँकानी देखील त्यांचे चार्जेस वाढविले आहेत. ICICI Bank ने देखील त्यांचे एटीएम वापर चार्जेस वाढविले आहेत. जसे की पहिले पाच वेळा तुम्ही निशुल्क पैसे काढू शकता, त्या नंतर मात्र तुम्हाला प्रती वेळेस 25 रुपये मोजावे लागणार आहे. HDFC आणि AXIS Bank ने देखील असेच नियम केले आहेत. या बँकानी पहिले पाच मोफत आणि त्या नंतर प्रत्येक वापरला 25 रुपये असे चार्जेस केले आहेत.