मुंबई | माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या नियुक्तीमुळे पक्षात अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला ठेवून तुलनेने कमी ओळखीच्या नेत्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेत्यांची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “काँग्रेसच्या नेतृत्वाने माझ्याशी संपर्क साधला होता, पण मी तरुण नेत्याला संधी द्यावी असे सुचवले. मात्र, हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या नावाची घोषणा झाल्यावर मलाही धक्का बसला, कारण त्यांचे नाव चर्चेत नव्हते. कोल्हापूरचे सतेज पाटील या पदासाठी योग्य असतील असे आम्हाला वाटले होते.”
काँग्रेसचे अन्य युवा नेते सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनाही हा निर्णय अपेक्षित नव्हता. पक्षात मोठा अनुभव असलेल्या आणि अधिक सक्रिय असलेल्या नेत्यांऐवजी सपकाळ यांना संधी का दिली गेली, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…