मुस्लीम समाजाने उर्फी जावेदवर घातली बंदी, स्मशानभूमीतही नाही मिळणार जागा!

Uorfi Javed Fatwa: आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते, मात्र पुन्हा एकदा उर्फीच्या अडचणी वाढणार आहेत. कारण अभिनेता फैजान अन्सारी याने उर्फीविरोधात फतवा काढला आहे. बऱ्याच दिवसांपासून उर्फी विरोधात लढा देणारा अभिनेता फैजान अन्सारी याने उर्फी विरोधात फतवा काढला आहे.

इतकंच नाही तर फैजान अन्सारीने जुहू स्मशानभूमीत अर्ज केला आहे. यासह उर्फीविरोधात फतवा काढण्यात यावा, असे त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मुस्लिम मुलगी विवस्त्र फिरते असे कोणी म्हटल्यावर फैजान अन्सारीला खूप लाज वाटते. उर्फीने इस्लाम धर्माचा अपमान केला आहे. ती मेल्यावर तिला स्मशानात जागाही दिली जाणार नाही, असे फैजान अन्सारीने म्हटले आहे.

तसेच फैजान अन्सारीने पुढे म्हटले की, उर्फी अर्धनग्न कपडे घालत जगभरात मुस्लिमांची बदनामी करत आहे. जर ती म्हणाली की ती इस्लामवर विश्वास ठेवत नाही, तर सर्वप्रथम तिचे नाव बदला. मुस्लिम मुलगी असे कपडे घालते असे कोणी म्हटल्यावर मला खूप वाईट वाटते. त्यामुळेच मी दिल्लीचे मौलाना आणि मुंबईचे शहर काझी यांनाही फतवा काढण्यास सांगितले आहे. उर्फीने आपला धर्म बदलावा. तसे तर तिने प्रत्येक धर्माच्या बाबतीतही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असेही फैजान अन्सारीने म्हटले आहे.

असं असलं तरी, उर्फीने तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे की ती स्वतःला मुस्लिम मानत नाही. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकसह तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.