चित्रा वाघ आणि उर्फी जावेद वादाला वेगळं वळण, अभिनेत्रीचं महिला आयोगाला पत्र; पाहा पत्रात काय म्हटलंय

मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील शीतयुद्ध आणखी पेटले आहे. नुकतेच चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. यानंतर आता उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाला पत्र लिहित अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांची तक्रार केली आहे. चित्रा वाघ यांनी आपल्याला धमाकवल्याने आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे स्वत:ला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी उर्फीने पत्रात केली (Chitra Wagh vs Urfi Javed) आहे. यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

उर्फीने काल रात्री राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. तिने तिच्या पत्रात म्हटलंय की, चित्रा वाघ यांनी मला प्रत्यक्ष दिसल्यास थोबडवण्याची धमकी केली होती. त्यामुळे मला आता मुंबईत असुरक्षित वाटू लागले आहे. म्हणून महिला आयोगाकडून मला सुरक्षा पुरवण्यात यावी. मात्र उर्फीने तिच्या पत्रात कुठेही चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली नाही.

यानंतर आता महिला आयोग उर्फीच्या पत्रावर काय भूमिका घेते?, हे पाहावे लागेल.