आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून केले जात आहे लसीकरण

अमरावती – जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर, तसेच मेळघाटातील पाड्यापाड्यांवर पोहोचून पात्र व्यक्तींचे लसीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून ठिकठिकाणी पोहोचून शिबिरांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हाधिका-यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रांजणा येथे लसीकरण शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.

विविध योजना, उपक्रमांची सांगड लसीकरणाशी घालून मोहिम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडण्याची चिन्हे आहेत. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कु-हा, गणोरी, खडिमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर, येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरनिराळी कार्यालये, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव सुर्जी बाजार समितीतील सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली.

मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहेत. लोकांचे प्रबोधन करणे, लसीकरणाचे महत्व पटवून देणे व लसीकरण आदी कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहे. दुर्गम भागापर्यंत पायी पोहोचून पथकांकडून मोहिमेची अंमलबजावणी होत आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘इंडियन आयडल मराठी’ च्या ऑडिशनला दुमदुमला महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतील आवाज

Next Post

तेलंगणाच्या सिमेवरील पिंपशेडा आदिवासी गावही आता पक्क्या रस्त्याने जोडले जाणार

Related Posts
फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 'मल्टिमॉडेल हब' नेमका काय आहे?

फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ‘मल्टिमॉडेल हब’ नेमका काय आहे?

Swargate Multimodel Hub | पुणे शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक…
Read More
हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Winter Session– नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न…
Read More
लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचा पुढाकार, रक्षाबंधनाचे औचित्य साधत दोनदिवसीय प्री- रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल

लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचा पुढाकार, रक्षाबंधनाचे औचित्य साधत दोनदिवसीय प्री- रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल

पुणे: रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते.…
Read More