‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये वच्छीची धमाकेदार एन्ट्री

पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वानेदेखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत. नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्यापर्यंत कथा येऊन पाहोचली आहे. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

माईची पुण्याई तिच्यासोबत असली तरी हवी एक अशी व्यक्ती जी या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. हे पत्रा आहे वच्छी. होय, ‘वच्छी परत येतेय’.

वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार, खरंच माईच्या पाठीशी उभी राहणार का, शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन वच्छी परत येतेय. मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल. रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post
prajkta mal

छगन भुजबळ यांच्या हस्ते प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Next Post

आई-वडिलांना फसवते याची खंत, पण…..

Related Posts
इंदुरीकर महाराजांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी; अंनिसची मोठी मागणी

इंदुरीकर महाराजांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी; अंनिसची मोठी मागणी

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा…
Read More
कालीचरण

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजांच्या अखेर मुसक्या आवळल्या

नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई…
Read More

IPL 2024 | ‘यंदाही आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकणे अशक्य’, केकेआरविरुद्धच्या खराब गोलंदाजीवरुन दिग्गजाने साधला निशाणा

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला केकेआर विरुद्धच्या एकतर्फी सामन्यात 7 गडी राखून पराभवाचा सामना करावा…
Read More