भारतीय रेल्वेने शनिवारी (२५ जानेवारी २०२५) जम्मू आणि काश्मीरमध्ये खास डिझाइन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची ( Vande Bharat Express) पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. श्री माता वैष्णोदेवी कटरा (SVDK) रेल्वे स्थानकावरून श्रीनगर रेल्वे स्थानकाकडे जाणारी ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलावरून गेली.
Three engineering marvels of Bharat;
🚄 Vande Bharat crossing over Chenab bridge and Anji khad bridge.
📍Jammu & Kashmir pic.twitter.com/tZzvHD3pXq— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 25, 2025
याबरोबरच वंदे भारत एक्सप्रेस ( Vande Bharat Express) अंजी खाड पुलावरूनही गेली. हा पूल भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. सकाळी साडेअकरा वाजता जम्मूमध्ये काही काळासाठी ट्रेन थांबली. यानंतर चाचणी पूर्ण करण्यासाठी ट्रेनला पुढील बडगाम स्टेशनवर नेण्यात आले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, लवकरच लोकांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनच्या पहिल्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवू शकतात.
लोक हार घालून वाट पाहत होते.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक आणि रेल्वे अधिकारी ट्रेनची वाट पाहत होते, त्यापैकी अनेकांनी ट्रेनमध्ये चढणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी हार घेतले होते. रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाच्या २७२ किमी लांबीचे काम पूर्ण केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे बोर्डाने गेल्या वर्षी ८ जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे अनावरण केले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule