Vasant More | मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील, उमेदवार २५ हजारांच्या लिडने निवडून येईल

Vasant More | पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात १३ मे रोजी मतदान पार पडले असून ४ जून रोजी मतमोजणी होईल. तत्पूर्वी कोणता उमेदवार किती मतांच्या फरकाने निवडून येईल याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जातं आहेत. पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे ( Vasant More) यांच्यात लढत होती.

दरम्यान शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यावेळी वसंत मोरेंनी मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे.

मोरे म्हणाले, मी स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. शहरात शेवटच्या भागापर्यंत जाऊन मी प्रचार केला आहे. पक्षानेही मला साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभा राहिला. अनेक ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याही या निवडणुकीत अनेक आठवणी आहेत. पण यावेळी मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील. जो कोणी उमदेवार जिंकेल तो किमान २० ते २५ हजारच्या लीडने निवडून येण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप