मुलाला मिळालेल्या धमकीनंतर वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,…

Vasant More : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे (Vasant More) बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाखांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. खंडणी न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. मुलाला धमकी आल्याने वसंत मोरेंची चिंता वाढली आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच विवाह सर्टीफिकेट व्हायल करण्याची धमकीदेखील दिली आहे. दरम्यान, यानंतर वसंत मोरे यांची देखील प्रतिक्रिया आली असून पोलिसांवर आमचा विश्वास असून ते योग ती कारवाई करतील असं मोरे यांनी म्हटले आहे.