जयपूर: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाचे कार्यक्रम मंगळवारपासून सुरु झाले आहेत. दोघांचे शाही लग्न राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे होणार आहे. यासाठी वधू-वर, त्यांचे कुटुंबीय तसेच काही जवळचे नातेवाईक सवाई माधोपूरला पोहोचले आहेत. दोघांच्या लग्नाशी संबंधित अनेक बातम्या आल्या आहेत त्यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे. आता या दोघांच्या लग्नात देण्यात येणाऱ्या जेवणाची बातमी समोर येत आहे.
विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी परदेशातून भाजी आणल्याचे वृत्त आहे. या लग्नात राजस्थानी खाद्यपदार्थांसोबत विदेशी पदार्थही पाहायला मिळणार आहेत. पाहुण्यांच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी परदेशातून भाजीपाला आयात करण्यात आला आहे. लग्नासाठी थायलंड, ब्राझील, फिलीपिन्स आणि तैवान येथून फळे आणि भाज्यांची आयात करण्यात आली आहे.
विकी-कॅटच्या लग्नासाठी तैवानमधून मशरूमची आयात करण्यात आली आहे, तर अॅव्होकॅडो फिलिपाइन्समधून येणार आहेत. यासोबतच बंगळुरू आणि नाशिकमधूनही कांदा आणि लसूण येणार आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नासाठी थायलंडहून खास द्राक्षे मागवण्यात आली आहेत. थायलंडमधून येणाऱ्या द्राक्षांची किंमत 2500 रुपये प्रतिकिलो असून लग्नासाठी 30 किलो द्राक्षांची ऑर्डर देण्यात आली आहे.
सोनोफिस नावाची भाजी ब्राझीलहून मागवण्यात आली असून, तैवानमधून ६२०० रुपये किलो किमतीचे मशरूम मागवण्यात आले आहे. परदेशी पदार्थांच्या बाबतीत, लग्नात पेरीपेरी पनीर, टॉर्टिला वेफर्स, पालक कॉर्न, काळे स्लो सॅलड, ब्रोकोली सॅलड, टोफू सलाद यांचा समावेश करण्यात येणार आहे. लग्नात पाहुण्यांना केवळ विदेशीच नाही तर राजस्थानी फ्लेवरही मिळतील. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना राजस्थानातील खास आणि प्रसिद्ध दाल-बटी-चुरमासोबत प्रसिद्ध कैर-सांगरी भाजी दिली जाईल.
https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM