राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली – शिवतारे

मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) ठाकरे गटावर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनीच हिंदुत्त्वाची (hindutva) खरी तोतयेगिरी केली असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचंही यावेळी विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

यावेळी शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्याची देखील आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी तेव्हा म्हटलं होतं की, कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करणार नाही. वेळ पडली तर माझं दुकानं बंद करले. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे.