गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक; लाखो रूपयांचा माल जप्त

दौंड – दिनांक १३/०५/२०२२ रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस गावचे हददीत पाटस टोलनाका येथे हातभटटीची दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले. सदर व्यक्तीकडुन वाहनासह सुमारे ४ लाख ७१ हजार ३५०  रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार (Narayan Pawar) यांनी सांगितले.

दिनांक १३/०५/२०२२ रोजी पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रविण चौधर यांचे पथक यवत पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की, सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे मारूती स्वीफ्ट (  एम.एच.१२ ए. टी. ७८९४)  मधुन एक इसम गावठी हातभटटीची तयार दारू वाहतुक करीत असलेबाबत माहिती मिळाली होती.

यानुसार पाटस पोलीस दुरक्षेत्र येथील सहा. फौजदार सांगर चव्हाण, पो .हवा. संजय देवकाते, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रविण चौधर यांनी पाटस टोलनाका येथे थांबले होते  . पोलिसांना मिळलेल्या माहिती प्रमाणे मारूती स्वीप्ट नं. (एम.एच.१२ ए.टी.७८९४ ) ही कार येताना दिसली .असता वरील पोलीस पथकाने बॅरीकेट लावुन सदर वाहन व त्यावरील चालक अमित धुल्ला गुडदावत (वय २४ वर्षे,) (रा. शेलारवाडी, गाडामोडी, ना दौंड, जि.पुणे ) यास ताब्यात घेवुन गाडीची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये ७ गावठी हातभटटीची तयार दारूची कॅन्ड मिळून आले .सदर मालाची  गाडीसह किंमत रूपये ४ लाख ७१ हजार ३५० आहे . पोलीस पथकाने सदर  मुद्देमाल जप्त केला आला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस, दौंड विभाग दौंड, नारायण पवार पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन, यांचे मार्गदशनाखाली सहा फौजदार सागर चव्हाण, पो.हवा. संजय देवकाते, निलेश कदम गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रविण चौधर यांनी केली आहे.