Viral Video : शार्कने व्यक्तीला जिवंत गिळलं, कॅमेरात कैद झाला धक्कादायक प्रसंगाचा थरार!
सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमधील विनोद नेटकऱ्यांना पोटधरुन हसायला भाग पाडतो. तर काही व्हिडिओंमधील दृश्ये अंगावर शहारा आणतात. असाच काहीसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक शार्क मासा समुद्रात पोहणाऱ्या एका व्यक्तीला जिवंत गिळताना दिसतोय.
इजिप्तच्या हर्घाडा येथील रिसॉर्टमध्ये पोहताना एका रशियन व्यक्तीला शार्क माशाने जिवंत गिळले आहे. हर्घाडाच्या एका लोकप्रिय इजिप्शियन रिसॉर्टला भेट देणाऱ्या इतर पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही फूट अंतरावर एका माणसाला शार्कने जिवंत खाल्लेले पाहिले. ही घटना ड्रीम बीच हॉटेलच्या समुद्रकिनाऱ्यावर घडली.
हा प्राणघातक हल्ला गुरुवारी झाला. त्यांनी सांगितले की, शार्कच्या हल्ल्यामुळे एका रशियनचा मृत्यू झाला. पीडितेची ओळख 23 वर्षीय ‘व्ही. पोपोव्ह’ अशी करण्यात आली आहे. ही व्यक्ती पर्यटक नव्हती. पोपोव्ह अनेक महिन्यांपासून इजिप्तमध्ये राहत होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शार्क माशा पोपोव्हला आपल्याकडे ओढून घेऊन खाताना दिसत आहे.
Shark attack at a beach in Egypt https://t.co/EJZcOjXfxl
— Leeroy Johnson (@LeeroyPress) June 8, 2023