सलग ५ पराभवांनंतर आरसीबीने उधळला विजयाचा गुलाल; कर्णधार म्हणाली, ‘विराट भैयामुळे…’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) अखेर आपले खाते उघडले. स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या नेतृत्वाखालील आरसीबीने बुधवारी डब्ल्यूपीएलच्या १३व्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा १२ चेंडू शिल्लक अशताना पाच गडी राखून पराभव केला.

आरसीबीची कर्णधार स्म्रीती मंधाना हिने या विजयाचे श्रेय आरसीबीच्या चाहत्यांना दिले आहे. सामन्यानंतर मंधाना म्हणाली, ‘प्रामाणिक समर्थकांचे खूप आभार. आमची परिस्थिती चांगली नसतानाही आम्हाला त्यांचा आधार मिळाला. हा विजय त्यांना समर्पित आहे.’

तसेच भारताचा धाकड फलंदाज आणि आयपीएलमधील आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सामन्यापूर्वी संघाला मार्गदर्शन केले होते आणि असे दिसते की कोहलीच्या फ्रँचायझीसह १५ वर्षांच्या अनुभवामुळे संघाला गती मिळण्यास मदत झाली. आपल्या पहिल्या विजयाबद्दल बोलत असताना आरसीबीची कर्णधार स्म्रीती मंधाना म्हणाली, “विराट कोहली भैयाच्या सल्ल्याने आम्हाला मदत झाली, त्याने आम्हाला प्रेरित केले आणि आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले.”