Vishwajit Deshpande | महाराष्ट्र शासनाने स्थापन अमृत (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिफ्टमेंट अँड ट्रेनिंग) संस्थेची अमृत विकास सल्लागार समिती काल स्थापन झाली. या समितीत पुण्यातून परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांची निवड सरकारने केली आहे. अमृत संस्था सारथी महाज्योती धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काम करते.
सदर समितीची पहिली बैठक शनिवार रोजी पुण्यातील अमृत च्या कार्यालयात संपन्न झाली यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी नवनियुक्त सदस्यांचा सत्कार केला तसेच अमृत च्या योजना तळागळापर्यंत पोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी सल्लागार समिती सदस्य सर्व विश्वजीत देशपांडे (Vishwajit Deshpande) निखिल लातूरकर बाजीराव भैय्या धर्माधिकारी क्षितिज पाटुकले अमृतच्या अधिकारी प्रिया देशपांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी असताना महायुतीत राज ठाकरेंची काय गरज”, रामदास आठवलेंचा खोचक टोला
बीएमसी निवडणुकीत उद्धव एकटेच लढणार? महाविकास आघाडी तुटण्याचे मिळतायंत संकेत!
लातूरमधील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाची नजर! शेतकऱ्यांना पाठवल्या नोटीस