‘त्यांनी’ आमच्या नेत्यांची एक प्रकारे शिकारच केलीय, गोव्यात TMC-काँग्रेस भिडले !

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत, राज्यातील राजकीय घाडामोडींना वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीत गोव्यात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्या प्रभावाने भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही प्रस्तापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या युती विषयावर टिपणी करण्यास नकार दिला. तसेच TMC ने लुइझिन्हो, रेजिनाल्डो या आमच्या नेत्यांना आमच्यापासून तोडून त्यांची एक प्रकारे शिकारच केली आहे. असा घणाघाती आरोप देखील केला आहे. तर, मला टीएमसीशी युती बाबत कोणत्याही चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या नाहीत. असं देखील ते म्हणाले

तर, ‘मला इतर पक्षांच्या सरचिटणीसांशी वाद घालायचा नाही. मी काँग्रेसचा अत्यंत नम्र कार्यकर्ता आहे,’ असे पी चिदंबरम म्हणाले. अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केल्यानंतर चिदंबरम यांनी हे विधान केले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास चिदंबरम यांनी जाहीरपणे जबाबदारी स्विकारावी असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.