महाभारतातील सर्व पात्रांचा इतिहास खूप रंजक आहे. पांडव आणि कौरवांसह, द्रौपदी देखील ( Draupadi birth) महाभारतातील मुख्य पात्रांपैकी एक होती. अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की द्रौपदी ही महाभारत युद्धाचे मुख्य कारण होती. द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांनी कौरवांशी महाभारत युद्ध लढले. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, आजही अनेक गावांमध्ये द्रौपदीला कालीचा अवतार मानले जाते, कारण द्रौपदीचा जन्म हवन कुंडातून झाला होता, म्हणूनच आजही भारतातील काही गावांमध्ये द्रौपदीची पूजा देवीप्रमाणे केली जाते.
महाभारतात असे सांगितले आहे की पांचाळ देशातील राजा द्रुपदने गुरु द्रोणाचार्यांकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यज्ञ केला होता. या यज्ञाच्या यज्ञअग्नीतून द्रौपदी प्रकट( Draupadi birth) झाली. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला असल्याने तिला यज्ञसेनी असेही म्हणतात. पांचाळ देशाची राजकन्या असल्याने, द्रौपदीला पांचाली असेही म्हटले जात असे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”
कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande
भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal