नागपुरात पोल्ट्री फार्ममध्ये शिरले पाणी; 3500 कोंबड्यांचा मृत्यू

नागपूर –  मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने संपूर्ण जीवन उधवस्त केले आहे. अशातच याचा फटका कोंबड्यांना देखील बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार तालुक्यामधील झिंजरिया शेतशिवारात सचिन मेश्राम (Sachin Meshram) यांचा अनेक वर्षांपासूनचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये एकूण 8 हजार कॉकरेल कोंबड्या होत्या. त्यापैकी तब्बल 3 हजार 500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला धक्काच बसला असून तो पुरता हवालदिल झाला आहे.

संततधार पडणाऱ्या या पावसानमुळे 3500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. आणि पावसाच्या पाण्याला निघायला मार्ग मिळाला नसल्याने त्याच ठिकाणी पाणी बराच वेळच साचून राहिले. त्यामुळे पोल्ट्री फार्मच्या खालच्या भागाने हे पाणी फार्मच्या आत शिरले.आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघाले. या पोल्ट्री शेडमध्ये एकूण 8000 कोंबड्या संगोपनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

यातील जवळपास 3500 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू (Death of hens) झाल्याचे फार्मर सचिन मेश्राम यांनी सांगितले. यात 30 बॅग पोल्ट्री फीड देखील ओले होऊन खराब झाले. यातील अनेक कोंबड्या या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिडरवर बसले होते. मेलेल्या कोंबड्या आणि खराब झालेले फिड याची एकूण नुकसान रक्कम ही पाच लाख रुपये असल्याचे फार्मरचे म्हणणे आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मरला शासनाकडून नुकसान भरपाईची (compensation for damages) अपेक्षा आहे.

आठवडा भरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील खुबगाव शेतशिवारात आसोलकर भावंडांचा अनेक वर्षांपासूनचा कुक्कुटपालनाचा  व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये एकूण 5 हजार 300 कोंबड्या होत्या. मुसळधार पावसाचे पाणी फॉर्मच्या आत शिरल्याने तब्बल 4 हजार 500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला धक्काच बसला असून तो पुरता हवालदिल झाला आहे. 4500 कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने या शेतकऱ्याचं दहा ते बारा लाखांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

कोंबड्यांना न मिळणाऱ्या भावामुळे फार्मर आधीच त्रासलेले असतांनाच मुसळधार पावसाने केलेले नुकसान फार्मरला आणखी संकटात ओढले आहे. पावसाचे पाणी शिरल्याने झालेले नुकसान हे कधी न भरून निघणारे आहे. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीने झाल्याने मृत्यूमुळे फार्मर आणखी विवंचनेत पडला आहे.