Raj-Uddhav Together | मुंबईत आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण घडला. त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या या एकत्र येण्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या विजयी मेळाव्याकडे लागलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट संदेश दिला की, “आम्ही केवळ आजच्या कार्यक्रमासाठी नाही, तर कायम एकत्र राहण्यासाठी आलो आहोत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसेच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा(Raj-Uddhav Together) बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.
या मेळाव्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. त्यांनी प्रखर भाषणात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे जाहीर कौतुक केले. “राज ठाकरे यांचं कर्तृत्व सर्वांना माहीत आहे. त्यांनी मला ‘सन्माननीय’ म्हटलं, यातच सर्व काही आलं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दोघांमधील जुन्या मतभेदांवर पडदा टाकत सुलह आणि एकजुटीचा इशारा दिला. “आमच्यातला अंतरपाट दूर झाला आहे, आता तुम्ही अक्षता टाका,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकतेचा संदेश दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील”, संजय राऊतांचा खोचक टोला
“शरद पवारांनीही जय कर्नाटक म्हटले होते याचा अर्थ…”, फडणवीस यांच्याकडून शिंदेंचा बचाव