दंगली कोण घडवतंय हे शोधलं पाहिजे – छगन भुजबळ

पुणे : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी अमरावती, हिंगोली, मालेगाव या ठिकाणी दंगल घडवून आणली असा आरोप नवाब मलिक यांनी अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर केला आहे. त्यावर दंगली कोण करतंय हा महत्वाचा मुद्दा आहे ते शोधून काढा दंगली घडवल्या नाहीत तर दंगली होणार नाही. दंगली, कोण घडवतंय हे शोधलं पाहिजे. असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुणे विद्यापीठाची पाहणी केली असता पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

छगन भुजबळ यांनी आज पुणे विद्यापीठाची पाहणी केली. पाणी केल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याबद्दल भाष्य केले. छगन भुजबळ म्हणाले पुणे विद्यापीठात आंबेडकर, फुले यांचा पुतळा आहे . सावित्रीबाईंचा पुतळा असावा अशी मागणी होती, 3 जानेवारीला पुतळा येथे स्थापन व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे छगन भुजबळ म्हणाले.

या पुतळ्याला काही संस्थांचा विरोध आहे त्यावर छगन भुजबळ म्हणाले, काही संस्थाचं म्हणणं आहे. ज्यांच्या नावाने विद्यापीठ ओळखले जाते त्यामुळे मुख्य इमारती जवळ जो केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी असावा अशी मागणी आहे. असे भुजबळ म्हणाले. पुतळ्याच्या विषया बाबत वाद वगैरे काही नाही. कामाला सुरुवात झाली होती. सूचना आल्या आहेत त्यावर आम्ही विचार करतोय. असे भुजबळ म्हणाले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

You May Also Like