जे राजकारण सुरू आहे ते बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे – जयंत पाटील

पालघर : बुलेट ट्रेन… हायवे… कॉरिडॉर ट्रेनच्या नावावर इथल्या लोकांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपण लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करायचा याची खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी आज घेतला.

पालघरचा हा शेवटचा भाग मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पदाधिकाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता आहे. पवारसाहेबांवर प्रेम असणारे अनेक लोक या भागात आहे, पवारसाहेबांशी निष्ठा असणारी अनेक घरं या भागात आहे. लोकांचा सगळ्यात जास्त पाठिंबा असलेला नेता आपल्या पक्षाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाला साजेसा पक्ष आपल्याला येत्या काळात तयार करायचा आहे असेही जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

विक्रमगडवासियांनी सुनील भुसारा यांना आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. भुसाराही आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. तुमच्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणत आहेत. भूसारा हा ‘आपला माणूस’ आहे, या आपल्या माणसाच्या मागे भक्कम उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

या भागात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या. बऱ्याच स्थानिक ठिकाणी महिला लोकांचे प्रतिनिधित्वही करत आहे. हे चित्र फार आशादायक आहे. ही परिस्थिती अधिक सुधारावी म्हणून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी विभाग काढून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना या विभागामार्फत न्याय दिला जाईल अशी घोषणाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

आपल्या आमदारकीच्या माध्यमातून सुनील भुसारा यांनी या भागाचा विकास करायला हवा, इथं पर्यटनाच्यादृष्टीने बऱ्याच गोष्टी करता येतील. त्या गोष्टी करून इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगतानाच त्यामुळे आपले तरुण उद्याचा पक्षाचा दुवा बनतील अशी खात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

संघटना चांगली आहे म्हणून विक्रमगड येथे आपण विजय खेचून आणला आहे. पक्षाचा जम अधिक बसावा यासाठी आपण ही परिवार संवाद यात्रा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आपण एकाच परिवाराचा भाग आहोत पण आपण नियमित भेटत नाही. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हे देखील पहा