आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायचीय, लोकांचे प्रश्न सोडवायचेत – Sharad Pawar

आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायचीय, लोकांचे प्रश्न सोडवायचेत - Sharad Pawar

Sharad Pawar On Vidhan Sabha Election : आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या कडे जे लोक आले त्यांना आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भागातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांना मदत करण्याच्या भावनेने जर कोणी येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, विशाळगडाच्या खाली जो मुस्लिम समाज राहत होता, त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांमध्ये कोल्हापूरचं कोण होतं असं दिसत नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतोय. हायकोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे तिथे शांतता प्रस्थापित होईल, हिच अपेक्षा असे पवार यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणूकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला. यापुढं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे, हा अतिशय उत्तम निर्णय झालाय. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवं, असेही शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, आता मला कल्पना नाही, ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचे लोक वक्तव्य करायला लागले. शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत. दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. ३५ वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना २५ वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही

K. C. Venugopal | महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आणि महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणार

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर

Total
0
Shares
Previous Post
We want to take back the Maharashtra Vidhan Sabha into our hands: Sharad Pawar

We want to take back the Maharashtra Vidhan Sabha into our hands: Sharad Pawar

Next Post
विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- Deputy CM Ajit Pawar

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- Deputy CM Ajit Pawar

Related Posts
अर्जुन खोतकर

अर्जून खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंची घेतली भेट

नवी दिल्ली- शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर…
Read More
nilesh rane

‘भंगार उद्धव ठाकरे म्हणे रडला… पक्ष बाळासाहेबांचा होता स्वतःच्या जीवावर एक केळ्याची गाडी टाकून दाखव’

मुंबई| ठाकरे गट (Thackrey Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने…
Read More
rain

पुढील तीन दिवसात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याचा अंदाज

नवी दिल्ली- पुढील तीन दिवसात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.…
Read More