आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, मग आता सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का ?

पुणे – राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल.

दरम्यान, महाविकास आघाडी (MVA) सरकारकडे 50 टक्के करकपातीची मागणी करत होतात. आता सत्तेत आल्यानंतर तटपुंजी कपात का केली? असा सवाल माजी उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेट्रोल-डिझेल दरावरुन (Petrol-Diesel Rates) उपस्थित केलाय.ते म्हणाले, विरोधात असताना मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला? जर 50 टक्के कर कपात केली असती तर डिझेलची किंमत 11 रुपये आणि पेट्रोलची किंमत 17 रुपयांनी कमी झाली असती. पण त्यांनी तसे केलेच नाही. विरोधात असताना मागणी करायची, अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची.

आज तीन आणि पाच रुपयांने किंमत कमी केली आहे. पण पुढील काही दिवसांत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवतेच. गॅस सिलिंडर वाढवतेच. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. आपण इतका टॅक्स कमी करुन देखील सीएनजीचा वापर करणारे ऑटो रिक्षावाले, टॅक्सीवाले, चारचाकी वाले सगळे भेटतात अन् म्हणतात की, ‘एकीकडे तुम्ही टॅक्स कमी करता अन् दुसरीकडे केंद्र सरकार वाढवते, आम्हाला काहीच फायदा होत नाही. ‘ पूर्वीचं बरं म्हणण्याची वेळ आली आहे, अशा प्रकराचं चित्र आहे.