मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू | Nana Patole

मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू | Nana Patole

Nana Patole | राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत. भाजपा महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करु आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करु, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

आझाद मैदानातील अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजपा युती सरकारची भूमिका संशयास्पद आहे, संगणक परिचालकांच्या मानधनातही भ्रष्टाचार शिरला आहे. संगणक परिचालकांची नेमणूक व मानधनाचा मुद्दा निकाली निघाला पाहिजे. ते अत्यंत कमी पैशात काम करतात. आता या अनुभवी संगणक परिचालकांना काढून दुसऱ्याची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाचा अधिकार ग्रामपंचायतीचा आहे पण सरकार पैसे देत नाही. महायुती सरकार हे आता काही दिवसांचे आहे हे सरकार सत्तेतून खाली खेचा महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तुम्हाला न्याय देऊ, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन | Nana Patole

महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन | Nana Patole

Next Post
सत्ता गेली चुलीत... सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीत तणाव, राष्ट्रवादी आक्रमक | Tanaji sawant

सत्ता गेली चुलीत… सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीत तणाव, राष्ट्रवादी आक्रमक | Tanaji sawant

Related Posts

राम कृष्ण हरी : नरेंद्र मोदी १४ जून रोजी येणार देहूत

पुणे – पंतप्रधानांच्या हस्ते होणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. काही…
Read More
Ashish Shelar | आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

Ashish Shelar | आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

Ashish Shelar | कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत मुंबई भाजपा…
Read More
Big Boss 17च्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल? ग्रँड फिनालेची तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या

Big Boss 17च्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल? ग्रँड फिनालेची तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या

Big Boss Grand Finale: टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस 17 आता त्याच्या फिनालेपासून फक्त एक दिवस दूर…
Read More