Chandrakant Patil | वर्षभर तरुणांमध्ये शौर्य निर्माण व्हावं यासाठी आवश्यक ते कार्यक्रम, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध पैलू सर्वांसमोर यावे यासाठी विश्व हिंदु मराठा संग आणि सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.
विश्व हिंदु मराठा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजी दिवस भर विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांना अभिवादन करतांना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. सदर जन्मोत्सव सोहळ्यासाठी विश्व हिंदु मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष पै. भूषण वरपे, उपाध्यक्ष वैभव दिघे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सकाळी महाअभिषेक, आरती, दुपारी अक्षय रक्त पेढीच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरमध्ये १९० रक्त पिशव्यांचे संकलन, सायंकाळी पातळेश्र्वर महादेव मंदिर ते धर्मवीर संभाजी महाराज स्मारक पर्यंत भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये टाळ मृदंगाच्या तालावर बाल वारकरी, पारंपरिक वाद्य, हलगी, तुतारी, अश्व, केशव शंखनाद पथक, शिवकन्या तचेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री थोर सरदार मावळ्यांच्या वंशजाकडून शंभू छत्रपतींना पारंपरिक शस्त्रद्वारे मानवंदना, मान्यवरांच्या हस्ते महाआरती तर साऊंड आणि लाईट शो चे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप